आणि बघता बघता संसाराची झाली राखरांगोळी

And the world became a mess
And the world became a mess

भादवण ः येथील श्रीमती कंबूबाई खुळे यांच्या घराला लागलेल्या आगीत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. यात संसारोपयोगी साहित्य, शेणी, लाकडे, शेती साहित्य जळून खाक झाले. याचबरोबर शेजारील दोन घरांचेही नुकसान झाले. मध्यरात्री एकच्या सुमाराला आगीची घटना घडली. प्रसंगावधान दाखवत सेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्‍यात आणली. आगीचे नेमके कारण समजले नाही.

खुळे यांचे साने गुरुजी गल्लीतील गोठणवसाहत (बाग) घर आहे. घरांच्या मागील बाजूस आगीचे लोळ व धूर दिसू लागला. बाळासाहेब पाटील यांनी तातडीने याची खबर ग्रामस्थांना दिली. त्यांनी सरपंच संजय पाटील यांना कल्पना दिली. पाटील यांनी तातडीने गावातील नळांना पाणी सोडून ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

दरम्यान, गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. खुळे यांच्या घरांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेजारील साईनाथ खुळे, सुरेश खुळे यांच्या घरांचेही नुकसान झाले. विजय केसरकर, संदीप पाटील, परसू जाधव, तुकाराम पाटील, पांडुरंग पाटील, दत्ता देसाई, अशोक गोईलकर यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूर 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com