

Sugar factory water pollution protest Kolhapur
esakal
Political Leader Factory Dispute : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात भेंडवडे येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याविरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याची घटना घडली. कारखान्याकडून मळी मिश्रित व काळे पाणी परिसरातील नदीत सोडण्यात येत असल्याचा आरोप करत भेंडवडेसह शेजारील गावातील ग्रामस्थांनी थेट कारखान्यावर धडक मोर्चा काढत दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.