
दहावी, बारावी परीक्षेसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास सुरुवात
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेस खासगीरीत्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन भरून घेण्यात येत आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डी. एस. पवार यांनी याच्या तारखा प्रसिद्धीस दिल्या आहेत शुक्रवार (ता. २९)पासून ही सुरुवात होईल.
पत्रकात म्हटले आहे, की २९ जुलै ते २४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरावे. १ ते २६ ऑगस्टपर्यंत मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद असलेला संपर्क केंद्र (शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात) जमा करणे. ३० ऑगस्ट संपर्क केंद्रात अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे.
ऑफलाईन अर्ज नाही
खासगी विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीतून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरावा. संकेतस्थळ ः दहावी http://form१७.mh-ssc.ac.in व बारावी http://form१७.mh-hsc.ac.in.
Web Title: Application Class 10th And 12th Exams
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..