
तारदाळ : तारदाळ गावच्या पूर्व बाजूस असणाऱ्या मगदूम मळ्यात घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी दोन घरांत जबरी चोरी केली. सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने, रोख ६२ हजार रुपये, एक मोबाईल असा एकूण ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. चाकूच्या भीतीने झोपी गेलेल्या महिलेला जाग येताच आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरी झाल्याचे उघड झाले.