Asaduddin Owaisi Kolhapur : 'महाराष्ट्रात मुस्लिम १४ टक्के तरी एकही खासदार नाही, आता नेतृत्व करायला शिका'; असदुद्दीन ओवेसी

Muslim Representation : ‘आॅपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी रोखले, विमाने, जहाजे थांबवली, व्यापार थांबविला, असे असताना पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना करण्याची गरज होती काय?
Asaduddin Owaisi Kolhapur

Asaduddin Owaisi Kolhapur

esakal

Updated on
Summary

ओवेसींची टीका – असदुद्दीन ओवेसी यांनी कोल्हापुरातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल करत “ऑपरेशन सिंदूर ३.० बावळट मोहिम” असे संबोधले आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना घेण्याची गरज काय, असा सवाल केला.

स्थानिक आणि राजकीय मुद्दे – ओवेसींनी शाहू महाराजांचे कौतुक करत विरोधकांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व नाही, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पोलिस नोटीस व संताप – इचलकरंजीत पोहोचल्यावर पोलिसांनी ओवेसींना आक्षेपार्ह वक्तव्य न करण्याची नोटीस दिली, यावर त्यांनी सभेत संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

Kolhapur Political News : ‘ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी रोखले, विमाने, जहाजे थांबवली, व्यापार थांबविला, असे असताना पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना करण्याची गरज होती काय? एक आशिया कप मिळाला नसता तर काही फरक पडला नसता; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक फायद्यासाठी आॅपरेशन सिंदूरमधील एअर फोर्स जवानांची बरोबरी क्रिकेट खेळांडूशी केली. त्यामुळे मोदी यांचे आॅपरेशन सिंदूर ३.० ही मोहीम बावळट असून, भाजप ही आता बँन्ड बाजा टीम बनली आहे’, अशी खरमरीत टीका ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केली.

येथील यशोलक्ष्मी मैदानावर कोल्हापूर जिल्हा एमआयएम पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, सचिव साजीद बिल्डर, सहसचिव शफिउल्ला काझी, जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, फैय्याज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com