
कोल्हापूर : विविध कामांचे प्रलंबित मानधन तात्काळ द्यावे व कार्यमुक्तीचे आदेश मागे घ्यावेत, या मागणीसाठी आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. यावेळी घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. आशा कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आरोग्यमंत्री यांच्यासह सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी जिल्हा परिषद हादरुन गेली. जवळपास चार तासाहून अधिक वेळ सुरु असलेले हे आंदोलन कार्यमुक्तीचे आदेश मागे घेतल्यानंतरच स्थगित करण्यात आले. ही कारवाई मागे घेण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी मित्तल यांना सुचना केली.
आशा कर्मचाऱ्यांना प्रशासन नवनवीन कामे लावत असते. ही कामे देत असताना मानधनाची घोषणाही करते. मात्र काम पूर्ण झाले की मानधनाचा विसर पडतो, अशा घटनाच आशा कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा परिषदेच्या आवारात पदाधिकारी व प्रशासनासमोर मांडल्या. पूरपरिस्थिती सर्व्हेक्षण करण्यासाठी 300 रुपयांचे मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच आयुष्यमान भारत, ज्येष्ठ नागरिक सर्व्हे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, कोरोना सर्व्हे, दिवाळी भेट आदींचेही मानधन देण्यात आले नाही.
हेही वाचा - ''भाजपने धनगर समाजाला फसवले''
दरम्यान क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. मात्र मानधनावरुन हे सर्व्हेक्षण करण्यास आशांनी नकार दिला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश दिले. या आदेशाला आज सर्व आशा कर्मचाऱ्यांनी टिच्चून विरोध करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत हा निर्णय रदद करण्यास भाग पाडले.
यावेळी बोलताना संघटना जिल्हा सचिव उज्वला पाटील म्हणाल्या, आशा कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाचे काम केले आहे. तरीही शासनाने मानधनाचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. याविरोधात आशांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मात्र या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तासाच्या आत कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिले आहेत. या आदेशाबददल प्रशासनाचा निषेध करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम आदींनी केले. या आंदोलनात शेकडो आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांनी सहभाग घेतला. दरम्यान या आंदोलनास जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती डॉ.पदमाराणी पाटील, स्वाती सासणे आदींनी पाठिंबा दिला.
या आहेत प्रमुख मागण्या
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.