

केमिस्ट्री विषय नको म्हणून कॉमर्सची निवड करणारा कोल्हापूरचा आसिम मेमन आता चार्टर्ड अकाउंटंट बनला असून, तो कोल्हापूर विभागात प्रथम आला आहे.
esakal
CA Results In The Kolhapur : चार्टर्ड अकाउंटंटस् (सीए)च्या अंतिम परीक्षेचा निकाल आज आयसीएआय (दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया)ने आज जाहीर केला. त्यात कोल्हापूरमधील ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागामधून आसिम मेमन याने प्रथम क्रमांक पटकविला. अभिमान माळी दुसरा, ऋतुराज दाबाडे तिसरा, तर सुष्मिता काटकर चौथी आली.
दरम्यान, देशातून मध्य प्रदेशमधील धामनोद येथील मुकुंद आगीवाल याने अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हैदराबादमधील तेजस मुंदडा याने द्वितीय आणि राजस्थानातील अलवर येथील बकुल गुप्ता तृतीय आला.