
Ajit Pawar Kolhapur : कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलण्यासाठी मंचकावर उभे राहिले. त्यांच्या नावाच्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. यातच एक कार्यकर्ता, ‘वुई लव्ह यू दादा’ म्हणाला. त्याला अजित पवार यांनी,‘आय लव्ह यू टू’, असे उत्तर देताच एकच हशा पिकला. तर, ‘लाडक्या बहिणींनो, गैरसमज करून घेऊ नका, त्या माझ्या मित्राला आय लव्ह यू म्हणालो आहे,’ असे अजित पवार यांनी म्हणत प्रकरणावर पडदा टाकला.