

वर्षांनुवर्षे सहकारी बँकेत तळ ठोकलेल्या संचालकांना बसणार दणका...
esakal
Maharashtra Cooperative Banks : सहकारी बॅंकांमध्ये सलग दहा वर्षे संचालक असलेल्यांना पुढे संचालक म्हणून राहता येणार नाही. या कायद्यानुसार बॅंकांमध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निर्णयाची अंमलबजावणीच्या तारखेला संचालक राहता येणार नाही, असे स्पष्ट झाल्यास अनेक आमदार, खासदार, मंत्र्यांनाही त्यांचे संचालक पद धोक्यात येणार आहे. त्यामुळे केव्हापासून संचालक पदाची दहा वर्षे मोजायची, याबाबत संभ्रमावस्था स्पष्ट करण्याबाबत बॅंक अधिकाऱ्यांसह संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत.