Kolhapur : बँक अधिकाऱ्यांचे अंतर्गत आंदोलन सुरू; बँकिंग क्षेत्रातील प्रश्न ऐरणीवर

Internal Protest : बँकिंग क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी बँक अधिकाऱ्यांनी अंतर्गत आंदोलन सुरू केले असून कर्मचारी वर्गातील असंतोष उफाळून आला आहे.
bank employees agitation

bank employees agitation

sakal

Updated on

कोल्हापूर : राज्यातील बँकिंग क्षेत्रातील अंतर्गत नियमांतून आजपासून आंदोलनाला सुरुवात झाली. ३० हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकृत ‘व्हॉटस्‌ ॲप ग्रुप’मधून बाहेर पडून संघटित शक्तीचे दर्शन घडवले. ‘यूएफबीयू’च्या आवाहनानुसार हे आंदोलन राज्यभर सुरू आहे. दरम्यान, सरकार व बँक व्यवस्थापनातील दुरावा दूर केला नाही तर पुढील टप्प्यात अचानक संप जाहीर केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com