Manyar Snake : रात्रपाळीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या अंथरुणात आढळला विषारी मण्यार साप; प्राथमिक आरोग्य केंद्रात खळबळ, कुठून आला साप अन् नेमके काय घडले?

manyar snake found in health worker bed : बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रपाळीदरम्यान महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंथरुणात विषारी मण्यार साप आढळला. सुदैवाने दंश झाला नाही.
manyar snake found in health worker bed

manyar snake found in health worker bed

esakal

Updated on

बाजारभोगाव (जि. कोल्हापूर) : ‎येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रपाळीसाठी झोपलेल्या महिला आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंथरुणात विषारी मण्यार साप आढळल्याने रविवारी पहाटे खळबळ उडाली. सुदैवाने सापाने कोणालाही दंश केला (Manyar snake incident in Kolhapur) नाही. मात्र, या घटनेमुळे कर्मचारी, रुग्ण व नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही आरोग्य केंद्रात चार साप आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com