

बेळगावः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन शुक्रवारी परत तापले. उसाला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर जाहीर करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग बंदचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. परिणामी हत्तरगी परिसरात परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.