इचलकरंजीकरांनो सजग रहा नाहीतर...

Beware people of the Ichalkaranji kohapur marathi news
Beware people of the Ichalkaranji kohapur marathi news

इचलकरंजी : राज्यातील सर्वाधिक दाट लोकसंख्येचे घनता असलेले शहर म्हणून लौकीक असलेल्या इचलकरंजीत नागरिकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा एखादा रूग्ण या ठिकाणी आढळल्यास दाट लोकवस्तीमुळे मोठा धोका होण्याची संभावना आहे. यामुळे प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकांनी गांभीर्याने कोरोनाबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

इचलकरंजी लोकवस्ती
सुमारे 28 चौरस किलोमीटर परिसर असलेल्या शहरात तब्बल 3 लाख नागरिक राहतात. म्हणजेच सरासरी 1 चौरस किलोमीटर परिसरात सुमारे 10 हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या 5 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील शहरात इचलकरंजीची लोकवस्ती अव्वल आहे.

हेही वाचा- मार्ग काय सापडेना : कोल्हापूरला जायचं म्हणत माऊलीने सोडले प्राण... -

कामगार वस्ती अधिक
शहरात कामगार, कष्टकरी वर्ग अधिक आहे. झोपडपट्टी, वाढीव वसाहत यामध्ये अत्यंत दाट लोकवस्ती आहे. एखादा रूग्ण या परिसरामध्ये आल्यास शहरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाने दक्ष राहून आपल्या भागात नवीन व्यक्तीला प्रवेशावर निर्बंध घालण्याची गरज आहे.


सवलतीबाबत गांभीर्य हवे
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांना सोयीसाठी काही काळ निर्बंध उठवत आहेत. मात्र या निर्बंधाच्या काळात नागरिकाकडून आवश्यक त्या नियमाचे पालन होत नसल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन आणि पोलिस खाते अटोकाट प्रयत्न करूनही नागरिकांच्यात नसलेली गंभीरता धोक्याची घंटा ठरू शकते.

सीमा लॉक करण्याची गरज
शहरात दररोज यापूर्वी 1 लाख बाहेरील नागरिक ये-जा करीत होते. बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या या शहराची सर्व सीमा लॉक करण्याची गरज आहे. आजही काही भागातून संशयास्पद व्यक्तींचा प्रवेश सहजपणे होत असल्याचे चित्र आहे. याबाबत प्रशासनाने सजगता दाखविण्याची गरज आहे.


दृष्टीक्षेपात इचलकरंजी शहर
 शहरात देशातील अनेक राज्यातील नागरिकांचे वास्तव्य
 कामगार आणि कष्टकरी वर्ग यांची संख्या अधिक
 शहर 28 चौरस किलोमीटर मध्ये वसलेले
शहरामध्ये तब्बल 3 लाख नागरिकांचे वास्तव्य
 प्रति चौरस किलोमीटर 10 हजारपेक्षा अधिक नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com