सत्तारूढ गटाने राधानगरी तालुक्यात ३७४ ते ८९८ मतांची आघाडी घेतली; परंतु फुटीर मतदानामध्ये विरोधी कौलवकर आघाडीचे संजयसिंह कलिकते व धैर्यशील पाटील-कौलवकर यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच झाली.
शिरगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत (Bhogavati Education Board Election) काँग्रेस (Congress), शेकाप, राष्ट्रवादी (ए. वाय. पाटील गट), डोंगळे गट, जनता दल, स्वाभिमानी आघाडीच्या सत्तारूढ राजर्षी शाहू शिक्षण सेवा आघाडीने १३ पैकी १२ जागा जिंकल्या. तर भाजप, शिवसेना (नरके गट), राष्ट्रवादी (धैर्यशील पाटील गट) आघाडीच्या दादासाहेब पाटील-कौलवकर शिवशाहू आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.