'बिद्री'चा दर राज्यात भारी! उसाला उच्चांकी प्रतिटन 3,407 रुपये दर; के. पी. पाटलांकडून मोठी घोषणा

Bidri Sugar Factory कारखान्याचे नूतन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी काल (शुक्रवार) याची घोषणा केली.
Bidri Sugar Factory KP Patil
Bidri Sugar Factory KP Patilesakal
Summary

निवडणुकीदरम्यान कारखान्याच्या प्रशासनाने ३२०० रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर केला होता.

बिद्री : येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने (Bidri Sugar Factory) यंदाच्या हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला उच्चांकी ३४०७ रुपये दर (Sugarcane Rate) जाहीर केला. कारखान्याचे नूतन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी काल (शुक्रवार) याची घोषणा केली. हा दर आजघडीला राज्यातील इतर साखर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक असल्याचे समजते.

के. पी. पाटील (K. P. Patil) यांनी नूतन संचालकांच्या पहिल्याच बैठकीत उच्चांकी दर जाहीर करून ऊस उत्पादकांना सुखद धक्का दिला आहे. यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, ‘‘निवडणुकीदरम्यान कारखान्याच्या प्रशासनाने ३२०० रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर केला होता.

Bidri Sugar Factory KP Patil
मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, पण आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही; भाजप आमदारानं व्यक्त केली खंत

यामध्ये २०७ रुपयांची वाढ करून यंदा प्रतिटन ३४०७ रुपये असा उच्चांकी दर देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला अधिकाधिक ऊसपुरवठा करावा.’’ यावेळी नूतन उपाध्यक्ष गणपतराव फराकटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई आदी उपस्थित होते.

Bidri Sugar Factory KP Patil
अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार; अजितदादा गटाला आणखी एक कॅबिनेट, दोन राज्यमंत्रिपद वाट्याला येण्याची शक्यता!

कारखान्याची एफआरपी प्रतिटन ३१९४.२९ रुपये बसते; मात्र प्रशासनाने ती ३२०० रुपये जाहीर केली. त्यामुळे गाळप होणाऱ्‍या उसाला प्रतिटन ३२०० प्रमाणे देण्यात येणार आहे. गळीत हंगाम समाप्तीनंतर दोन टप्प्यांत उर्वरित रक्कम देण्यात येणार आहे.

- के. पी. पाटील, कारखाना अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com