

November Sugarcane Bill Credited
sakal
बिद्री : येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने शेतकरी हिताला प्राधान्य देत चालू गळीत हंगामातील १६ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसासाठी प्रतिटन ३६१४ रुपये या दराने उसबिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.