कोल्हापूर : रिक्षा मस्त, कमी पाण्यात स्वच्छ

बिंदू चौक रिक्षा मंडळाच्या सदस्यांचा ‘पाणी वाचवा’ संकल्प
Bindu Chowk Rickshaw Board members
Bindu Chowk Rickshaw Board membersSakal

कोल्हापूर - रिक्षा धुण्यासाठी कमी पाण्याचा वापर करू, एक लिटर पाण्यात रिक्षा स्वच्छ करून सांडपाण्याची निर्मिती कमी करू, आम्ही कोल्हापूरचे रिक्षा चालक आहोत, नदी प्रदूषणमुक्त करण्यात योगदान देऊ, असा संकल्प बिंदू चौकातील स्व. सुभाषराव बबनराव कोराणे रिक्षा मित्र मंडळाने आज केला.

निसर्ग मित्र आणि कॉमन मॅन संघटनेतर्फे त्यांना १ लिटर पाण्यात रिक्षा स्वच्छ कशी करायची? याचे प्रशिक्षण दिले. निसर्ग मित्रचे अनिल चौगुले म्हणाले, पावसाळ्याचे चार महिने सोडले तर उरलेल्या ९ महिन्यांत रिक्षा स्वच्छ करण्यासाठी १ लिटर पेक्षा जास्त पाण्याची आवश्यकता नाही. सर्वप्रथम साध्या कापडाने रिक्षा पुसून घ्यायची. त्यामुळे रिक्षावरील धूळ जाते. त्यानंतर एक लिटर पाण्याच्या बाटलीला स्प्रे बसवून संपूर्ण रिक्षावर पाणी फवारावे. त्यानंतर चिमॉस कापडाने रिक्षा पुसावी. हे कापड पाणी शोषून न घेता ते पसरवते. कमी पाण्यात रिक्षा स्वच्छ होते. अशा पद्धतीने सर्वांनी रिक्षा स्वच्छ केल्यास हजारो लिटर पाण्याची बचत होईल. सांडपाण्यात घट होऊन प्रक्रिया प्रकल्पांवरील ताण कमी होईल.’

रिक्षा मंडळाचे खजानीस सलीम सरकवास, संचालक राजमहंमद मुजावर, राजू गायकवाड, बालम बागवान, साजीद मुल्ला, जहीरअली सैय्यद, इरफान समाधान, राजूशाने दिवान, जाफर मुजावर, नजीर बागवान, जाफर उत्साद, युसुफ शेख, राजू मुल्लाणी, अन्सार बागवान, संजय सावंत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com