

कर्नाटकात ऊसदराच्या प्रश्नावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता भाजपही उतरली आहे.
esakal
Sugarcane News : काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या ऊसदर आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गुर्लापूर फाट्यावर सहा दिवसांपासून शेतकरी ऊस दरासाठी आंदोलन करत असून, मंत्री, मुख्यमंत्री तिकडे फिरकलेलेही नाहीत. तोडगा काढण्याचाही प्रयत्न केला नाही. काँग्रेस सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी केला.