
कोल्हापूर : ‘बूस्टर’साठी कॅम्पचा पोलिसांना आधार
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे धोके लक्षात घेता पोलिसांसाठी बूस्टर डोसच्या कॅम्पचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक ती काळजी घ्या, धोका वाढतोय, अशा सूचनाही प्रशासनाकडून पोलिसांना केल्या जात आहेत.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
कोरोना काळात सुरवातीपासून पोलिस अग्रस्थानी राहून काम करत आहेत. पहिल्या दुसऱ्या लाटेत बंदोबस्ताबरोबर मदत कार्यात जिल्हा पोलिस दल सक्रीय होते. कंटनेन्मेट झोनवरही पोलिसांचा बंदोबस्त तैनात असायचा. दररोज अनेकांशी येणाऱ्या संपर्कातून अनेक पोलिस कोरोनाबाधित झाले होते. जिल्ह्यातील दोन पोलिसांचा मृत्यूही झाला होता. कोरोना बाधितांवर वेळेत योग्य ते उपचार व्हावेत, यासाठी जिल्हा पोलिस दलाने स्वतंत्र व्यवस्थाही दोन्ही लाटेत केली होती. यात डॉक्टर, औषधे, रुग्णवाहिका, जेवण, नाष्टा आदीची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जिल्हा पोलिस दलाचे जवळपास १०० टक्के कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसीकरण झाले आहे.
हेही वाचा: फळबाग लागवडीत खटाव तालुका आघाडीवर; 'महात्मा गांधी रोजगार हमी'चे उद्दिष्ट पूर्ण!
कोरोनाची तिसरी लाट डोकेवर काढते आहे. काही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यात अधिकारी वर्गांचाही समावेश आहे. यातील अनेकांना डिस्चार्जही मिळाला आहे. हा धोका विचारात घेऊन वरिष्ठांकडून पोलिसांना बुस्टर डोस घेता यावा, यासाठी कॅम्पचे आयोजनही केले आहे. अलंकार हॉल येथे काही दिवसापूर्वी बुस्टर लसीचा कॅम्प घेतला होता. यात २६३ पोलिस कर्मचारी हा डोस घेतला. अशा पद्धतीचे कँम्प ग्रामीण भागात आयोजित करून पोलिसांना बुस्टर डोस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बुस्टर लस वेळेत घ्या. मास्क, सॅनिटायझरचा वापर करा. कर्तव्य बजावताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा अशा सूचनाही देण्यात येत आहेत.
दृष्टिक्षेपात
अधिकारी १५९
कर्मचारी २७६२
सध्याचे बाधित पोलिस २०
कोरोनामुक्त पोलिस २८
Web Title: Booster Camp Support For Police Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..