esakal | 'राधानगरी’ धरणाचे उघडलेले दोन्ही दरवाजे बंद
sakal

बोलून बातमी शोधा

राधानगरी

'राधानगरी’ धरणाचे उघडलेले दोन्ही दरवाजे 'बंद'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. राधानगरी धरणाचे काल उघडलेले तीन आणि सहा क्रमांकाचे दोन स्वयंचलीत दरवाजे आज बंद झाले. त्यामुळे सध्या विद्युत विमोचनासाठी राधानगरी धरणातून केवळ १४०० क्युसेक विसर्ग आहे. पंचगंगा नदीची पातळी २४ फूट ११ इंचापर्यंत असून कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरून १९ हजार ४४४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात १४ बंधारे पाण्याखाली आहेत.

हेही वाचा: 'पंधराव्या वित्त आयोगातून राज्यासाठी 1292 कोटी'

शहरासह जिल्ह्यात आजही पावसाची रिपरिप सुरू राहिली. ऊन-पाऊस असे वातावरण असले तरी मधूनच मोठ्या सरी पडत होत्या. हवेत गारवा आहे. राधानगरी धरणाचे दोन्ही स्वयंचलीत दरवाजे आज बंद झाले. सहा क्रमांकाचा दरवाजा सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी तर तीन क्रमांकाचा दरवाजा दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी बंद झाला. त्यामुळे ४२५६ क्युसेक विसर्ग बंद झाला. कालपासून गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड तालुक्यांत मोठा पाऊस झाला.

बाराही तालुक्यांत पाऊस सुरू असून शिरोळ तालुक्यात सर्वांत कमी केवळ १.१ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आज सकाळी अकरा वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये अशी, हातकणंगले- ३.९, शिरोळ- १.१, पन्हाळा- १८.३, शाहूवाडी- २९.५, राधानगरी -१५, गगनबावडा- ५०.६, करवीर- ५, कागल- ४.७, गडहिंग्लज- ५.५, भुदरगड- ५.७, आजरा-१४.३ व चंदगड- २९.८

loading image
go to top