

ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांच्या कूळ कायद्यातील जमीनी परत मिळाव्यात
esakal
Kolhapur Bramhan Samaj : ‘ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी कूळ कायद्यात गेल्या आहेत. त्या जमिनी परत मिळाव्यात. ब्राह्मण शेतकऱ्यांच्या जमिनींना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासह विविध मागण्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे राज्य शासनाकडे केल्या आहेत. ब्राह्मण समाज सामाजिक सलोख्यासाठी अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे’, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली. महासंघातर्फे दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासाठी ते आज येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.