
कोल्हापूर : दोन भावांमध्ये सुरु असलेली हाणामारी रोखणाऱ्या वडिलांचा आज मध्यरात्री एकच्या दरम्यान मृत्यू झाला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मीरअहमद अब्बास मुल्ला (वय ७५, रा. सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत) असे त्यांचे नाव आहे.