कागदापासून बनवली बुलेट, बाहुल्या अन्‌ कार्टुन्स 

Bullets, dolls and cartoons made from paper
Bullets, dolls and cartoons made from paper

कोल्हापूर : पेन्सिलच्या साह्याने रेषांच अचूक गणित तिला जमतं. रेषांना नाविन्यपूर्ण छटा देत कलाकृतींचा एक अनमोल नजारा तिने रेखाटलाय. संचारबंदीत तिच्या कल्पनेचे क्षितीज किती विस्तारलेले आहे, याची प्रचिती देत तिने कागदापासून बुलेट, छोट्या बाहुल्या साकारल्या आहेत. तिच्या या कलाकृती "सई रे सही' असल्याचा साक्षात्कारही अनेकांना झालाय. एसएससी बोर्डाच्या परिसरातील म्हाडा कॉलनीमधील सई सुभाष देसाई या शालेय विद्यार्थिनीने ही कमाल केली आहे. 

सई राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. कोरोनाच्या संचारबंदीत अभ्यास तर करायचा आहे. पण, तो किती तास करायचा यालाही मर्यादा आहे. छंद म्हणून काय करता येईल असा विचार शालेय विद्यार्थ्यांना संचारबंदीत पडला. सई त्यापैकी एक होती. चित्रकलेची आवड तिला बालपणापासून आहे. संचारबंदीत अभ्यासात ढिलाई न करता हातात पेन्सिल घेऊन चित्रे काढायला तिने सुरुवात केली. चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण स्कूलमध्ये मिळालं असलं तरी एखाद्या पट्टीच्या चित्रकाराच्या क्‍लासमध्ये जाऊन तिने धडे गिरवलेले नाहीत. तरीही तिला रेषांना वळण कसे द्यायचे हे ठाऊक आहे. 

कागदापासून विविध कलाकृती करण्यातही ती मागे नाही. तिने कागदापासून बुलेट, बाहुल्या बनवल्या आहेत. वॉल पेंटिंगमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. घरातल्या भिंतीवरच तिने चित्रे, कार्टून्स रेखाटली आहेत. पेन्सिलवर छोट्या-छोट्या कलाकृती साकारुन त्या मैत्रिणींना भेट दिल्या आहेत. चित्रकाराच्या भूमिकेत वावरणारी सई कथ्थकचे प्रशिक्षणही घेत आहे. तिने पाच परीक्षाही दिल्या आहेत. तिचे वडील सुभाष देसाई ग्रंथपाल असून, आई दीपाली गृहिणी आहेत. दोघे तिला प्रोत्साहन देण्यात कमी पडत नाहीत. 

युट्युबवर कागदापासून कलाकृती कशा तयार करतात हे मी पाहिले होते. केवळ पाहूनच मी कलाकृती करायला शिकले आहे. चित्रकलेतील डूडलिंग कला प्रकार कोणाकडे शिकायला गेले नव्हते. सरावाने तो मला जमलाय. 
- सई सुभाष देसाई 


सई रे सही... 
- कागदापासून बनवल्या बुलेट, छोट्या बाहुल्या 
- वॉल पेंटिंगमध्येही तिने केले स्वतःला सिद्ध 
- भिंतीवरच रेखाटली चित्रे, कार्टून्स 
- पेन्सिलवर छोट्या कलाकृती साकारुन त्या मैत्रिणींना दिल्या भेट 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com