esakal | व्यापार बंदला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद

बोलून बातमी शोधा

businessman in kolhapur closed today market close movement

बंदला पाठिंबा देण्यासाठी आज शहरातील सराफ कट्टा 100 टक्के बंद राहिला.

व्यापार बंदला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जीएसटीच्या जाचक अटीला विरोध करण्यासाठी आज देशभरात व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे. या बंदला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी बंद पाळण्यात आला तर काही ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरु होते. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोड, चप्पल लाईन, राजारामपुरी, शाहूपुरी येथील बहुतांश दुकाने बंद होती. मात्र काहींनी दुकाने सुरू ठेवल्यामुळे बंद 100 टक्के यशस्वी होऊ शकला नाही.

दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या जीएसटी विभागातील कार्यालयांना निवेदन सादर केले आहे. आणि जाचक अटी मागे घेण्याची विनंती केली आहे. 

हेही वाचा - कोल्हापूर : सेनापती कापशीत आलेल्या त्या टस्कराची ओळख पटली ; नाव आलं समोर -

बंदला पाठिंबा देण्यासाठी आज शहरातील सराफ कट्टा 100 टक्के बंद राहिला. काही कापड व्यावसायिकांनी बंदचे आवाहन धुडकावून लावले. शहरातील होलसेल धान्य बाजारपेठ मात्र बंद राहिली. तरीही किरकोळ विक्रेत्यांनी व्यवहार सुरू ठेवल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला नाही. मात्र शहरात बंद सदृश्य वातावरण मात्र राहिले. कोल्हापूर जिल्हा लोरी ऑपरेटर असोसिएशनेही बंदला पाठिंबा दिल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक ट्रान्सपोर्ट कार्यालय बंद राहिली. आज कोणतीही मालवाहतूक झालेली नाही.

संपादन - स्नेहल कदम