esakal | के.डी.सी बँकेचे अधिकारी रणवीर चव्हाण यांचा अपघातात मृत्यू...

बोलून बातमी शोधा

car accident mumbai pune expressway kolhapur martahi news

साखर कारखान्याच्या कर्जपुरवठा संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत जात असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याचा आज अपघातात मृत्यू झाला.

के.डी.सी बँकेचे अधिकारी रणवीर चव्हाण यांचा अपघातात मृत्यू...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : साखर कारखान्याच्या कर्जपुरवठा संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत जात असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याचा आज अपघातात मृत्यू झाला. रणवीर चव्हाण (वय 51 सांगली)असे त्यांचे नाव आहे .मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल जवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी आहेत. 

हेही वाचा- आंबेओहोळ धरणाचे काम पुन्हा बंद पाडले -
  श्री चव्हाण हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्ज विभागात चे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. आज मंत्रालयात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांची बैठक होती. त्यांच्यासह  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दोघे अधिकारीही होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पनवेल जवळ त्यांच्या कारला ट्रकने मागून धडक दिली त्यामध्ये श्री चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर कारखान्याचे आणि दोघे कर्मचारी जखमी आहेत. साखर कारखान्याच्या कर्जपुरवठा संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत जात असताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याचा आज अपघातात मृत्यू झाला. रणवीर चव्हाण (वय 51 सांगलीl असे त्यांचे नाव आहे .

हेही वाचा- शनिवारची सुट्टी मिळाली पण...सरकारी कर्मचारी हैराण -

असा झाला अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल जवळ झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी आहेत. श्री चव्हाण हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्ज विभागात व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. आज मंत्रालयात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी त्यांची बैठक होती. त्यांच्यासह  कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दोघे अधिकारीही होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पनवेल जवळ त्यांच्या कारला ट्रकने मागून धडक दिली त्यामध्ये श्री चव्हाण यांचा मृत्यू झाला तर कारखान्याचे आणि दोघे कर्मचारी जखमी आहेत.