
कोल्हापुरातील सातेरी दरीत कार कोसळली...
esakal
तीन ठळक मुद्दे (Highlight Summary Points):
सातेरी दर्शनावरून परतताना भीषण अपघात:
करवीर तालुक्यातील सातेरी दर्शन करून परत येताना मिठारीचा दरा येथे मारुती कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, यात पाचगाव येथील दत्तात्रय (३२) आणि अश्विनी पवार (२८) हे दोघे गंभीर जखमी झाले.
रात्रभर दरीत अडकले, सकाळी ग्रामस्थांनी बचाव केला:
अपघात रात्री अकरा वाजता झाला असून, दोघे रात्रभर जखमी अवस्थेत दरीत अडकले होते. पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तरुणांनी कार दिसल्यावर साखळी पद्धतीने हात धरून दरीत उतरून बचावकार्य केले.
जीवितहानी टळली; नागरिकांनी रस्त्याच्या सुरक्षेची मागणी केली:
जखमींना उपचारासाठी कोल्हापूरला दाखल करण्यात आले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र रस्त्याची दुरवस्था व संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.
Accident Sateri Valley in Kolhapur : कुंडलिक पाटील : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सातेरी येथे देवदर्शन घेऊन परत येत असताना वाघोबावाडी ते आमशी दरम्यान मिठारीचा दरा येथील खोलदरीत पाचशे फुटावर मारुती कार कोसळली. यामध्ये दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत .दत्तात्रय रघुनाथ पवार वय ३२, अश्विनी दत्तात्रय पवार वय २८ रा. प्रगती कॉलनी पाचगाव अशी त्यांची नावे आहेत. रात्री अकरा वाजता हा अपघात झाला. त्यानंतर रात्रभर दोघे दरीतच जखमे अवस्थेत होते.