

कोल्हापूरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
esakal
Sugarcane Protest News : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, आंदोलन भडकण्याची चिन्हे आहेत. त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर आंदोलकांनी ऊस कांड्या फेकत आपला रोष व्यक्त केला. महामार्गावर उजळाईवाडी परिसरात दुपारी साडेबाराच्यादरम्यान अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची एकच धांदल उडाली.