esakal | कागलमध्ये जेसीबीमधून गुलालाची उधळण करणं पडलं महागात
sakal

बोलून बातमी शोधा

कागलमध्ये जेसीबीमधून गुलालाची उधळण करणं पडलं महागात

कागलमध्ये जेसीबीमधून गुलालाची उधळण करणं पडलं महागात

sakal_logo
By
नरेंद्र बोते

कागल : कागल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बानगे (ता. कागल) मनीषा संग्राम सावंत यांची निवड झाली. निवडीनंतर त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात जल्लोषात रथातून मिरवणूक काढत जेसीबीमधून गुलालाची उधळण केली. अनोख्या पध्दतीने जल्लोष करण्याचा प्रकार नूतन उपसभापती व त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडला आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा कागल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी नूतन उपसभापती मनीषा संग्राम सावंत, बानगेचे उपसरपंच लंबे, जेसीबी मालक नेताजी पाटील, फोटोग्राफर आदी सोळा जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी दिली आहे.

कागल समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड (९) जुलै रोजी पार पडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते रमेश तोडकर (लिंगनूर दुमाला) यांची सभापतीपदी तर संजय घाटगे गटाच्या मनीषा सावंत (बानगे) यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडून आलेल्या दोन्ही उमेदवारांना, 'मिरवणुक काढु नये' अशी सी.आर.पी.सी.149 प्रमाणे नोटीस बजावणी केली होती. मात्र त्याचे उलंघन उपसभापती मनिषा सावंत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले.

हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात

आदेशाचा भंग करुन बाणगे गावात रथामधुन काढलेल्या मिरवणुकीमध्ये जेसीबीमधुन गुलालाची उधळण केली. त्याचे फोटो व व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. या प्रकरणी कागल पोलिस ठाण्यात भा.द.वि.सं.कलम गुरनं व कलम भा.द.वि.सं.कलम 188 सह, आपत्ती व्यवस्थापन सन 2005 चे कालम 51 [ब], साथीचा रोग प्रतिबंधक कायदा कलम 1897 मधील खंड 2,3,4 चे उल्लंघन, महाराष्ट्र कोव्हिड- 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उपसभापती श्रीमती मनीषा संग्राम सांवत, संग्राम सावंत, रमेश सावंत, बानगे गावचे उपसरपंच लंबे, अमोल सावंत, सुनिल बोंगार्डे, सुरेश मारुती गुरव, सुशांत शिवाजी घेवडे, सुरज नलवडे, अशोक निवृत्ती पाटील, दत्ता सावंत, मदन शामराव पाटील, दत्तात्रय लंबे, फोटोग्राफर विनायक पाटील, जेसीबी मालक नेताजी पाटील, धनाजी पाटील लांबडे (सर्वजण रा. बाणगे) अशा १६ जणांविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा: राज्यातील 12 हजार कैदी पॅरोलवर; कारागृह महानिरीक्षकांची माहिती

loading image