Kolhapur : चंदगड वनक्षेत्रात वाघाचा अधिवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : चंदगड वनक्षेत्रात वाघाचा अधिवास

Kolhapur : चंदगड वनक्षेत्रात वाघाचा अधिवास

कोल्हापूर: जिल्ह्यातील घनदाट जंगली भाग असलेल्या चंदगड संवर्धन राखीव वनक्षेत्रात वाघाने शिकार केल्याचे पुरावे मिळाल्याने या क्षेत्रात वाघाच्या अस्तित्वाला दुजोरा मिळाला आहे. येथे पावलांचे ठसेही मिळाले आहेत. हा परिसर संरक्षित क्षेत्र झाल्याने वाघाच्या अधिवासासाठी वातावरण पूरक ठरल्याची बाब अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा: 'स्वच्छ भारत अभियान' समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी राहुल शेवाळे

चंदगडचे जंगल कर्नाटक, गोव्याच्या जंगली सीमेला जोडले आहे. या भागात यापूर्वीही वाघांचा अधिवास आढळला होता. कर्नाटकातील दांडेली, भीमगड, महाराष्ट्रातील तिलारी, दोडामार्ग, आजरा, भुदरगड, चंदगड, राधानगरी, विशाळगड मार्गे चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्यापर्यंत वाघांचे भ्रमण होत असते. गतवर्षी आंबोली, दोडामार्ग तसेच चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर झाले. त्यामुळे या भागातील वन्यजीवांचा भ्रमण मार्ग जोडण्यास मदत होत आहे.

आंबोलीत यापूर्वी वाघाचे दर्शन झाले होते, तर लॉकडाउन काळातही वाघ तेथे दिसला होता. त्या पाठोपाठ गेल्या काही दिवसांत येथे वाघाने रेड्याची शिकार केल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्याच ठिकाणी वाघाच्या पावलांचे ठसेही आढळले आहेत. त्यावरून या परिसरात वाघाचा अधिवास असल्याची बाब ठळक झाली आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी दिली आहे.

हेही वाचा: पालकमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ; धनंजय महाडिक यांचा आरोप

चंदगड ते कोयना टापूतील सात तालुक्यांतील जंगली भागाचा पट्टा संवर्धन राखीव क्षेत्र आहे. यात वन्यजीवांचा भ्रमण मार्ग अखंड राहिला आहे. प्रजनन क्षेत्रातील वाघ व इतर तृणभक्षक प्राणी त्या क्षेत्रातील जोडणाऱ्या जंगलात स्वतंत्र अधिवास निर्माण करू शकतात, असाही वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

loading image
go to top