esakal |  चंदगड, आजरा व राधानगरीसाठी निधी मंजूर; आता गरोदर महिलेचा जाणार नाही प्राण

बोलून बातमी शोधा

Chandgad Ajra and Radhanagari from the state budget and district annual plan kolhapur marathi news

राज्याचा अर्थसंकल्प व जिल्हा वार्षिक योजनेतून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला

 चंदगड, आजरा व राधानगरीसाठी निधी मंजूर; आता गरोदर महिलेचा जाणार नाही प्राण
sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : राज्याचा अर्थसंकल्प व जिल्हा वार्षिक योजनेतून चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली पत्रकाद्वारे दिली आहे. 
पत्रकात म्हटले आहे की, राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ले धनगरवाडा येथे गेल्या पावसाळ्यात रस्ता व्यवस्थित नसल्याने गरोदर महिलेस औषधोपचार वेळेत न मिळाल्याकारणाने प्राण गमवावा लागला होता. 

याकरीता आवश्यक बाब म्हणून म्हासुर्ले ते सावतवाडी ते मधला धनगरवाडा जोड रस्त्यावरील ओढ्यावर साकव बांधण्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 35 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे म्हासुर्लेपैकी मधला धनगरवाडा, पादुकाचा धनगरवाडा, राणग्याचा धनगरवाडा येथील ग्रामस्थांना दवाखाना, बँका, बाजाराकरिता जवळचा बारमाही मार्ग होणार आहे.  

हेही वाचा- ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर आलीय ही वेळ; ७२ अभियंत्यांवर १५०० योजनांचा भार

राधानगरी धरण हे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना असलेने याठिकाणी देशभरातील हजारो पर्यटक या धरणास भेट देत असतात. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी धरण निर्मितीचे ऐतिहासीक कार्य केले, याबाबतची माहिती या पर्यटकांना मिळावी म्हणून याठिकाणी केंद्र परिसर सुधारणा व बागबगीचा करण्यासह धरण स्थळावर दगडी फरशी बसवून विद्युतीकरण करण्याकरिता ५० लाख रुपयांचा निधी पर्यटन स्थळांचा विकास अंतर्गत मंजूर झाला आहे.

संपादन- अर्चना बनगे