

Fadnavis Announces Shaktipeeth Highway
sakal
चंदगड : ‘शक्तिपीठ महामार्ग चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागाची भाग्यरेषा ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तालुक्यातील ५५ गावांतील शेतकऱ्यांना जमिनीची मालकी देणारा हेरे सरंजाम प्रश्न येत्या अधिवेशनात निकाली काढण्याचा तसेच प्रशासकीय कामकाजाची सोय म्हणून चंदगड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करीत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.