

Tiger Relocation Chandoli
esakal
Chandoli Wild : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चांदोली अभयारण्यात ‘ऑपरेशन तारा (Tiger Augmentation and Range Expansion)’ या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने काल (ता.०९) सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षांची मादी वाघीण T7-S2 हिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन (Acclimatisation) कुंपणात सॉफ्ट रिलिज करण्यात आले.
ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात करून तीला सोडण्यात आले. दरम्यान ताडोबा जंगलातून दुसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आली आहे.
राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) करीत असून, या मोहिमेवर डॉ. नंदकिशोर काळे – सहाय्यक निरीक्षक (प्रोजेक्ट टायगर) व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे.