चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर वक्तव्य केले.
esakal
Chandrakant Patil : संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या आदीच केली घोषणा
मुख्य हायलाइट्स (३ मुद्दे)
जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा आजच शक्य, दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होऊन जानेवारीअखेर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता – मंत्री चंद्रकांत पाटील.
“निवडणूक म्हणजे फास्ट ट्रेनसारखी आहे”, कार्यकर्त्यांनी नाराज न होता प्रयत्न सुरू ठेवावेत, महायुतीने सक्षम उमेदवार उभे करावेत – पाटील यांचे मार्गदर्शन.
“उद्धव ठाकरे थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर आज परिस्थिती वेगळी असती”, असा टोला; कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे आवाहन.
Kolhapur Chandrakant Patil : कदाचित आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे, त्यामुळे अनुभवाच्या आधारे अंदाज मांडतोय. दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होईल आणि जानेवारी अखेरपर्यंत महापालिका निवडणुका होतील.” असं मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांची असल्याचेही ते म्हणाले. कोल्हापूर येथे भाजपच्यावतीने ग्रामीण मेळावा आयोजीत करण्याता आला होता यावेळी ते बोलत होते.