मुख्यमंत्री खासगी रुग्णालयात, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का? - चंद्रकांत पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

'मुख्यमंत्री खासगी रुग्णालयात, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का?'

कोल्हापूर - मुख्यमंत्री खासगी रुग्णालयात गेलेत, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का ? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सत्तेत असणारे पक्ष पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करावेत यासाठी आंदोलन करतात. नाना पटोले सायकलवरून, अमित देशमुख बैलगाडीने, हे नुसते स्टंट, आता केंद्राने पेट्रोल डिझेलचा अबकारी कर कमी केला. त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात पाच आणि दहा रुपयांनी कमी झाले. त्यामुळे प्रत्येक राज्यात आणखी एक रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली. ते झाल्यानंतर ११ हून अधिक राज्यांनी दर कमी केले आहेत. त्यांनी व्हॅट कमी केला. महाराष्ट्राचा पेट्रोलवर २४ टक्के आणि सेस ९ टक्के आहे. दुष्काळ, भूकंपाचा सेस आहे. केंद्राने कर कमी केला मग तुम्ही इतर राज्यांप्रमाणे कमी का करत नाही असा सवाल चंद्रकांत पाटलांनी (chandrakant patil) विचारला.

हेही वाचा: जिल्हा बॅंकेत 'या' दोन भाऊंची एन्ट्री होणार काय ? जो मजबूत, तो टिकेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेला होत असलेल्या वेदनेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यावरूनीही चंद्रकात पाटील यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री खासगी रुग्णालयात गेले. म्हणजे सरकारी रुग्णालयात सुविधा नाहीत का? सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का? देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला तेव्हा ते सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते. आता मुख्यमंत्री जिथे कुठे आहेत तिथे त्यांनी निवेदने स्वीकारावेत असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला कठोर शब्दांत सुनावले आहे. या सरकारच्या काळात लोकांचे संसार देशोधडीला लावला जात आहे. कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जात आहे. यावर बोलतना मेस्मा कायद्याने नोटिसा कसल्या बजावता असा सवाल चंद्रकात पाटील यांनी केला. तसंच विलिनिकरणाला वेळ लागेल असं म्हणताय. कर्मचाऱ्यांचे १७ महिन्यांपासून पगार दिलेला नाही असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा: 'डुकराशी कुस्ती' फडणवीसांच्या इंग्रजी वाक्यावर राऊतांचा मराठी बाणा

loading image
go to top