Chandrakant Patil latest statement on Sharad Pawar
esakal
कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वय झाले असून, ते आता थकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्यातरी पक्षासोबत जावे, असा त्यांच्याच पक्षातील नेत्यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे शरद पवार यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा,’ असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Sharad Pawar NCP future political alliance) सांगितले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ‘एसआयआर’बाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.