फडणवीसांनी वटारलं तर तुमचं साम्राज्य एक दिवसात उद्ध्वस्त होईल, चंद्रकांतदादांचा सतेज पाटलांना इशारा

Chandrakant Patil गोकुळच्या राजकारणावरून भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत सतेज पाटलांना थेट इशारा दिला.
Chandrakant Patil Targets Satej Patil

Chandrakant Patil Targets Satej Patil

Esakal

Updated on: 

गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दूध संघाबाहेर महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. या सभेत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत सतेज पाटलांना थेट इशारा दिला. 'फडणवीसांनी वटारलं तर तुमचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल. फडणवीस तेल लावलेला पैलवान आहे. त्यांच्या नादाला लागू नका,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Loading content, please wait...