
Gokul Dudh Poilitics
esakal
Gokul milk Politics News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) महायुतीच्या ताब्यात असल्याचा जोरदार दावा होत आहे. त्यामुळे आगामी वार्षिक सभा समझोत्यावर पार पडेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर ‘गोकुळ’मधील परंपरेप्रमाणे सत्ताधाऱ्यांकडून गैरसभासदांना ‘प्रवेश पास’ वाटप करण्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मंगळवारी (ता. ९) ‘गोकुळ’ची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे.