
राजेंद्र दळवी
पन्हाळा : पन्हाळ्याचे प्रवेशद्वार असलेला चार दरवाजा, जो ब्रिटिशांनी घोडागाडी किंवा तत्सम वाहतुकीच्या साधनातून दळणवळण सुलभ व्हावे म्हणून तोफांनी पाडून तेथे रस्ते तयार केले होते; पण आता पन्हाळगडाचा समावेश ‘युनेस्को’च्या यादीत होण्यासाठी हालचाली सुरू झाल्यामुळे भारतीय पुरातत्त्व विभागाने युद्धपातळीवर पन्हाळागडाच्या संवर्धनाचे काम सुरू केले होते. त्यातूनच या चार दरवाजाचे संवर्धन सुरू केले. ते काम दोन महिन्यांपासून बंद पडले आहे.