रसायनयुक्त पाणी पंचगंगा नदीतील जलचरांच्या मुळावर

पंचगंगा उगमापासून कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीपर्यंत अशा दोन टप्प्यांत वर्गवारी केल्यास कोल्हापूर ते इचलकरंजीदरम्यान नदी सर्वाधिक प्रदूषित होते.
Panchganga River Polution
Panchganga River Polutionsakal
Summary

पंचगंगा उगमापासून कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीपर्यंत अशा दोन टप्प्यांत वर्गवारी केल्यास कोल्हापूर ते इचलकरंजीदरम्यान नदी सर्वाधिक प्रदूषित होते.

कोल्हापूर - काळे दुर्गंधीयुक्त पाणी, (Black Smelling Water) कारखान्यांची रसायनमिश्रित (Chemical Mix) मळी आणि विविध उद्योगांतील प्राणघातक रसायनमिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत (Panchganga River) सोडल्याने असे विषारी पाणी (Poison Water) नदीतील जलचरांच्या (Aquatic) मुळावर उठले असून नदीतील जलचर संपवण्यास कारणीभूत ठरत आहे. पंचगंगा नदीच्या उपनद्या आणि उगमापासून ते कोल्हापूर शहरापर्यंत सुमारे सात साखर कारखाने तसेच विविध उद्योग आहेत. याचे रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते, हे भयाण वास्तव वर्षानुवर्षे कायम आहे.

पंचगंगा उगमापासून कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीपर्यंत अशा दोन टप्प्यांत वर्गवारी केल्यास कोल्हापूर ते इचलकरंजीदरम्यान नदी सर्वाधिक प्रदूषित होते. पंचगंगा खोऱ्यात सहा औद्योगिक वसाहतींतील बहुतांश उद्योगांनी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारली आहेत. दरम्यान, ४० ते ५० वर्षांपूर्वीचे जे उद्योग आहेत, त्यांच्याकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र किंवा पाणी जिरवण्याची क्षमता नसल्याने असे रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जाते.

शिरोली, गोकुळ शिरगाव, पंचतारांकित औद्योगिक वसाहत पंचगंगा नदी क्षेत्रात आहे. गोकुळ शिरगाव वसाहतीत फौंड्री उद्योगांकडे पुरेशी जमीन नसल्याने याचे पाणी पंचगंगेत मिसळते. लक्ष्मी वसाहतील रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योगांनी स्वत:ची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. तरीही काहीवेळा दूषित पाणी पंचगंगेत येते. पार्वती औद्योगिकमध्ये टेक्‍स्टाईल प्रोसेस, यंत्रमाग आहेत. याशिवाय इतर उद्योग वसाहतीतील पाण्यावर हवे तेवढे नियंत्रण नाही. त्याचा फटका पंचगंगेला बसतो. उन्हाळ्यात सर्वाधिक पाणी प्रदूषित होते. प्रवाह कमी असतो किंवा पूर्णच थांबलेला असल्यामुळे पाणी तिथेच राहून त्याला दुर्गंधी येते. रुई (ता. हातकणंगले) येथे सर्वाधिक दूषित पाणी जाते.

पंचगंगा उगमापासून जिल्ह्यात असणाऱ्या उद्योगांची स्थिती

  • ३५०० - एकूण उद्योगांची संख्या

  • ५० (घनमीटर) । १०५ उद्योगांकडून वापरले जाणारे पाणी

इचलकरंजीतील सांडपाण्याची सद्य:स्थिती

  • सांडपाणी - ४० ते ४५ एमएलडी

  • प्राथमिक, दुय्यम प्रक्रिया - २५ ते ३० एमएलडी

  • पूर्ण प्रक्रिया - १५ ते २० एमएलडी

‘चला, पंचगंगा वाचवूया’ मोहिमेत शिवाजी विद्यापीठाचा पहिल्यापासून सक्रिय सहभाग राहिला आहे. २०११ च्या मोहिमेतही पर्यावरणशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी नदीचा अभ्यासात्मक दौरा करून पाण्याची गुणवत्ता तपासली होती आणि ती सर्वांसमोर ठेवली होती. ही तपासणी सातत्याने आम्ही करतो. येत्या काळातही अभ्यासात्मक सहभाग नक्कीच राहणार असून, समाजातील सर्व घटकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.

- डॉ. आसावरी जाधव, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

इचलकरंजीतील सर्व प्रक्रियाधारक, साखर कारखाने, सांडपाणी, गांधीनगरमधील प्लास्टिक हे पंचगंगा नदीत जाते. परिणामी १५० हून अधिक जलचर प्राण्यांचे जीवन धोक्‍यात आले आहे. औद्योगिक वसाहती जरूर असल्या पाहिजेत. पण, त्यातून बाहेर पडणारे घातक पाणी जलचरांनाच नव्हे तर मानवालाही घातक ठरत आहे. याचा सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे.

- संदीप गुदले, स्वाभिमानी शेतकरी संघटना व पर्यावरणप्रेमी

सध्या घरोघरी कमोडचा वापर होत आहे. त्याच्या फ्लश टॅंकची क्षमता पाच ते सात लिटर असते. त्यामुळे प्रत्येक वेळी पाच ते सात लिटर पाण्याचा वापर केला जातो. जवळ जवळ दोन ते तीन लिटर पाणी उगाच वाया जाते. फ्लश टॅंकमध्ये दोन ते अडीच लिटरची रिकामी बाटली पाण्याने भरून टोपण लावून टॅंकमध्ये टाकली तर टॅंकमध्येच पाणी दोन ते तीन लिटर पाणी मावेल आणि फ्लश होताना तेवढेच पाणी फ्लश होईल. गरजच असेल तर परत फ्लश करता येईलच. प्रत्येक वेळी दोन ते तीन लिटर पाणी वाचेल, सोपा प्रयोग आहे.

- रवींद्र कुलकर्णी, हनुमाननगर

आम्ही सहभागी, तुम्हीही व्हा..!

पंचगंगा वाचवा मोहिमेत सायबर महाविद्यालय एमबीए विभाग, मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशन, प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशन, जैन सोशल ग्रुप, देवराई (डेव्हलपमेंट रिसर्च अवेअरनेस ॲण्ड ॲक्शन इन्स्टिट्यूट), गार्डन्स क्लब, पंख फाउंडेशन, व्हाईट आर्मी, निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी, हिंदू युवा प्रतिष्ठान, रंकाळा वॉकर्स, अरिहंत जैन फाउंडेशन, दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूट, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, अर्थ वॉरियर्स, कलासाधना मंच, सार्थक क्रिएशन्स, डॉ. आझाद नायकवडी लोककला, सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन, पोलिसमित्र रेस्क्यू फोर्स, राजारामपुरी युवक मित्रमंडळ आदी संस्था सहभागी होणार आहेत. ‘पंचगंगेला वाचविण्यासाठी आम्ही सहभागी होतोय, तुम्हीही व्हा’ असे आवाहन त्यांनी केले.

पाणीबचतीचे छोटे प्रयोग ‘सकाळ’कडे पाठवा

पंचगंगेचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्यासाठी कोल्हापूरकर पुन्हा एकवटणार असून, ‘सकाळ’च्या आवाहनाला विविध संस्था, संघटनांसह तालीम संस्थांचा प्रतिसाद मिळत आहे. २१ आणि २२ एप्रिलला राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडी निघणार असली, तरी पाणीबचत आणि संवर्धनाचा जागरही यानिमित्त होईल. तुमच्या घरी, गल्लीत, कॉलनीत पाणीबचत, सांडपाणी निर्गतीकरणाचे जे काही छोटे-छोटे प्रयोग केले असतील, ते ‘सकाळ’कडे पाठविल्यास निवडक प्रयोगांना प्रसिद्धी दिली जाणार आहे. मोहिमेत सहभागाबरोबरच पाणीबचत, संवर्धनासाठी केलेले प्रयोग, सांडपाणी निर्गतीकरणाचे छोटे प्रयोग पुढील व्हॉट्‍सॲप क्रमांकावर पाठवा ः

- व्हॉटस्‌ ॲप क्रमांक - ९१४६१९०१९१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com