

Wild animal attacks in Chandgad Kolhapur
esakal
Animal attack Kolhapur : अडकूर (ता. चंदगड) येथे वडिलांच्या कुशीत शांत झोपलेल्या सव्वा वर्षाच्या बालकावर अचानक कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात त्याच्या चेहऱ्यावर नाकाला व डोळ्याखाली जखम झाली आहे. प्रवीण अरुण चव्हाण (वय १४ महिने, मूळ गाव भूतातांडा, जि. विजापूर, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. वडिलांनी प्रसंगावधान राखत केलेल्या प्रतिकारामुळे कोल्ह्याने पळ काढला आणि बालकाचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.