esakal | शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांचा चक्क काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना फोन
sakal

बोलून बातमी शोधा


शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांचा चक्क काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना फोन

शिवसेनेच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांचा चक्क काॅग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना फोन

sakal_logo
By
सुनिल पाटील

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या निवडणुकीतील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनेलचे उमेदवार आज रात्री घोषित केले जाणार आहेत. दरम्यान, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पालकमंत्री सतेज पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली. विरोधी पॅनेलकडून आज रात्री पॅनेल जाहीर केले जाण्याची शक्‍यता आहे.

गोकुळच्या निवडणूकीत विरोधी पॅनेलमध्ये कोणा-कोणाचा संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज दिवसभर यासाठी भेटी-गाठी व बैठक मॅरेथॉन बैठक सुरु आहे. तसेच, विरोधी पॅनेलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यराज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय मंडलिक, माजी आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे यांनी पॅनेल बांधीणी केली आहे. यामुळे उमेदवारी देताना या सर्वच नेत्यांचा कस लागणार आहे.

काही दिवसापूर्वी मुलाखती झाल्या, यावेळी या सर्व नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळो अगर न मिळो शेतकऱ्यांसाठी तुम्ही एकत्र राहणे गरजेचे आहे. असे आवाहन केले होते. आज विविध ठिकाणी झालेल्या बैठकीतही हाच सुर नेत्यांकडून आळवला गेला. आता रात्री पॅनेल जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी आमदार मिणचेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनीच पाटील, मुश्रीफ व यड्रावकर यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे विरोधी पॅनेलमध्ये डॉ. मिणचेकर यांचे नाव राहणार की नाही हे पॅनेल जाहीर झाल्यानंतर समजणार आहे. यामुळे शिवसेनाही या निवडुकीत सक्रीय झाली असल्याचे चित्र आहे.

Edited By- Archana Banage