
Kolhapur News Today : कोल्हापुरामध्ये दोन गटांत वाद होता. पोलिसांनी वाद नियंत्रणात आणलेला आहे; पण ज्यांनी दंगली घडविली, त्या सर्वांवर कारवाई होणार, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना दिला. भाजप जातीय दंगली घडवून आणत आहे, या विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर द्यायचे टाळले. विरोधकांना काही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ कशाला वाया घालवता, अशी टिप्पणी करत त्यांनी विरोधकांच्या टीकेला टोलवले.