
Mahadevi Elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील ‘महादेवी हत्तीणी’च्या वनतारामधून परत आणण्यासाठी कायदेशीर पेचातून मार्ग काढण्याबाबत सरकारकडून पाऊले गतिमान झाली आहेत. ‘महादेवी’ला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. ५) मुंबईत बैठक पार पडली. यामध्ये महादेवीसाठी राज्य सरकार मध्यस्ती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.