

Maharashtra weather today IMD
esakal
IMD Forecast Maharashtra Winter : पुणे आणि परिसरामध्ये किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता. २५) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान कोकणात सर्वात निच्चांकी तापमान १२ अंश नोंद झाली तर कोल्हापुरात १४ अंशापर्यंत तापमान स्थीर आहे.