

Western Maharashtra Cold Wave
esakal
Maharashtra Temperature Drop : उत्तर भारतात थंडीची लाट आली असल्याने महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तापमान १० अंश सेल्सिअसच्याही खाली आले होते. पुढील आठ दिवसांत राज्यातील सर्वच भागात तापमानात घट होईल. पश्चिम महाराष्ट्रात किमान तापमान आठ ते कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.