

कोल्हापुरात काँग्रेस नेत्यांचा बंगला फोडला, पत्नीवर धारधार शस्त्राने वार; कुरिअर बॉय असल्याचा बहाण्याने रोकड लुटली
esakal
Fake Courier Boy Kolhapur : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील-गिजवणेकर यांच्या बंगल्यात आज सायंकाळी चोरट्यांनी घुसत घरफोडी केली. यावेळी घरात एकट्याच असलेल्या त्यांच्या पत्नी अक्कमहादेवी (वय ७८) यांच्यावर चोरट्याने धारधार शस्त्राने वार करत १५ हजारांची रोकड लुटून नेली. सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला.