Kolhapur circuit bench: १० वर्षांहून अधिक खुर्चीला चिकटून बसलेले संचालक जाणार घरी! २६ बँकांमधील संचालकांनी भितीने घेतली सर्किट बेंचमध्ये धाव
Cooperative Banking Sector: बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या अंमलबजावणीत झालेल्या बदलांमुळे १ ऑगस्ट २०२५ पासूनच नियम लागू मानला जात असल्याने संचालकांच्या भवितव्यावर संकट; त्यामुळे राज्यभरातील बँकांची एकत्रित पाऊलवाट न्यायालयाकडे वळली.
कोल्हापूर: सहकारी बॅंकांमध्ये सलग १० वर्षे संचालकपदावर राहिलेल्या जिल्ह्यातील आणि राज्यातील निम्या संचालकांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. मंत्री, आमदार, खासदारांचा यात समावेश आहे.