esakal | नेर्लीत एकाचा कोरोनाने मृत्यू ; आंबेगावात दोघे तर नेर्लीत एकजण पॉझिटिव्ह ..
sakal

बोलून बातमी शोधा

Corona dies at Nerli Two in Ambegaon and one in Nerli are positive

कोरोनाचा तालुक्यातील दुसरा बळी : तालुका हादरला : सोहोलीतील एकजण कोरोनामुक्त

नेर्लीत एकाचा कोरोनाने मृत्यू ; आंबेगावात दोघे तर नेर्लीत एकजण पॉझिटिव्ह ..

sakal_logo
By
संतोष कणसे

कडेगाव (सांगली) : नेर्ली (ता.कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या सत्तावन्न  वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा आज पहाटे साडे बाराच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला.तर त्यांच्या 28 वर्षीय मुलाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.तर आंबेगाव (ता.कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या 36 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीची 12 वर्षीय मुलगी व 9 वर्षीय मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.तर त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

आज पहाटे तालुक्यातील एकूण तीन जणांना कोरोनाची लागण झाली तर कोरोनाने तालुक्यात दुसरा बळी गेल्याने सर्वत्र प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून तालुका अक्षरशः हादरुन गेला आहे.तर सोहोली (ता.कडेगाव) येथील 55 वर्षीय व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा- दिलासादायक ! आरगावातील भावा-बहिणीची कोरोनावर मात -

नेर्ली येथील 57 वर्षीय व्यक्ती पत्नी व मुलगा व मुलगी अशी एकूण चौघेजण सोमवारी मुंबई येथून नेर्ली (ता.कडेगाव) येथे आपल्या मूळगावी आले होते.त्यांना आरोग्य विभागाने त्यांच्या घरी होम क्वारंटाईन केले होते.यापैकी 57 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल केले.तेथे त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतलले असता  अहवाल पॉझिटिव्ह आला होता.


त्यानंतर तालुका आरोग्य विभागाने  त्यांची पत्नी व मुलगीला कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले.दरम्यान कोरिना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या  28 वर्षीय मुलासही मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
दरम्यान आज पहाटे साडे बाराच्या सुमारास नेर्ली येथील 57 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.तर आज पहाटे त्यांच्या सोबत कोविड रुग्णालयात दाखल केलेल्या त्यांच्या 28 वर्षीय मुलाचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.तर त्यांची पत्नी व मुलगी यांच्या घशातील स्वाईबचे नमुने आज घेतले जाणार आहे.

हेही वाचा- तरुणीला भाळून सीएची नियत ढळली -


तर आंबेगाव (ता.कडेगाव) येथील मुंबईहून आलेल्या 36 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीची 12 वर्षीय मुलगी व 9 वर्षीय मुलाचा रिपोर्ट कोरोना आज पहाटे पॉझिटिव्ह आला आहे.तर त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आला आहे.तर तालुक्यात कोरोनाचा आज दुसरा बळी गेल्याने व आज एका दिवसांत तीन नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.तर खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसिलदार डॉ.शैलजा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. माधव ठाकूर,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी नेर्ली व आंबेगावला भेट देऊन येथे मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक उपाय योजना केल्या.तसेच नागरिकांना दिलासा देत काळजी घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा- नव्या वर्षात टिव्ही, रेडिओवरून मिळणार शिक्षणाचे धडे -


सोहोलीतील एकजण कोरोना मुक्त

सोहोली (ता.कडेगाव) येथील 55 वर्षीय व्यक्तीने कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.ते कोरोनामुक्त झाल्याने तालुक्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 
तालुक्यातील कोरोना बाधितांची  संख्या 13, तर दोघांचे बळी

कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथे पाच,सोहोली येथे दोन,आंबेगाव येथे तीन,खेराडे वांगी येथे एक,नेर्ली येथे दोन असे एकूण आज अखेर 13 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.तर भिकवडी येथील 65 वर्षीय वृद्धाचा तर नेर्ली येथील 57 वर्षीय व्यक्ती असे तालुक्यातील एकूण दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

loading image