esakal | आली लग्न घटिका समीप; अंतरपाटच्या दुनियेत 'सप्तपदी'ची युवतींत जबरदस्त क्रेज

बोलून बातमी शोधा

null

आली लग्न घटिका समीप; अंतरपाटच्या दुनियेत 'सप्तपदी'ची युवतींत जबरदस्त क्रेज

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर: लग्न म्हणजे एक अतुट बंधन. दोन कुटुंबे एकत्र येण्याचे संकेत.जीवाभावाच्या जोडीदारासोबत आयुष्याची एक सुंदर रेशीम गाठ. सप्तपदी आणि अंतर पाठाची धार्मिक विन. सात जन्माचे फेरे घेऊन जीवनाची नवीन सुरुवात करण्याचे अनेकांचे स्वप्न. लग्न म्हणले की  वेगवेगळे शॉपिंग. यामध्ये मग विविध प्रकारच्या साड्या, ज्वेलरी छोट्या-मोठ्या अनेक गोष्टी. प्रत्येक गोष्ट निवडता आले सिलेक्शन आणि फॅशन. जसे साडी आणि ज्वेलरीमध्ये फॅशन आली आहे तशीच आता अंतरपाट आणि सप्तपदी मधील फॅशन आली आहे. आता ही क्रेज खुणावते नव युवतींना..

दुसऱ्या लाटे नंतर आता लग्न समारंभामध्ये बरीच बंधने आली आहेत. कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसमारंभ आटपला जातोय. आयुष्यातील एक संस्मरणीय ठरणारा लग्न हा कार्यक्रम मोठ्या झोकात व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. मात्र या सर्वाला पायबंद घालून अनेकांनी लग्नाचे कार्य उरकून घेत आहेत.  अनेकांना मोठी हौस असली तरी लग्न पुढे किती ढकलायचे याबाबत ही वधू आणि वर पक्षांकडून फारशी मानसिकता दिसतच नाही त्यामुळे काढलेला योग्य मुहूर्तावर जसे जमेल तसे लग्न उरकण्याची घाई सध्या सुरू आहे.

हेही वाचा- संसर्गासोबत वाढतोय मृत्यूचा आकडा; वाचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

   'ना बँड ना बाजा ना बराती' अशी वेळ म्हणायची आली आहे. आता तरी दोन तासांमध्ये लग्न समारंभ उरकण्याचे शासनाचे निर्बंध आहेत.या कमी वेळात जास्तीत जास्त हा सोहळा कसा चांगल्या पद्धतीने पार पाडला जावा यासाठी अनेक ट्रेंड रुजू घालत आहेत यामध्ये आता नवीन क्रेज आलीय ती अंतरपाठ आणि सप्तपदीची.

 जरीची साडी, बॉर्डरचे ब्लाउज, खूप सारे गोल्डन ज्वेलरी, मोत्याच्या मुंडावळ्या हा नववधूचा ड्रेस तर शेरवानी डोक्यावर पगडी मंजुळा हा नवऱ्याचा साज. यालाच शोभणारा अंतरपाट तोही पांढरे शुभ्र सिल्कच्या कपड्यां वरती वेलवेट ची पावले. त्याच्यावरती चमक आणि कडेला बॉर्डर वेगळ्या कलर आणि डिझाइन ची अशी सप्तपदी. तसेच अंतर पाठांमध्ये नवरा नवरी, सनई-चौघडे, स्वस्तिक ,कलश ,देवाचे काही फोटोज, कडेला छानशी लेसची बॉर्डर. सुंदर असे तोरण. काही काही अंतर पाटावर हात हातामध्ये असलेला इमेज लोगो. 

सुंदर कलरफुल डिझाइन्समध्ये वेगवेगळ्या कलर मध्ये अंतरपाठ उपलब्ध झाले आहेत.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी आता अंतरपाटाचा समावेश झाला आहे.विशेष म्हणजे असे अंतरपाठ आज वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सहजपणे उपलब्ध होऊ लागले आहेत त्यामुळे लग्नाची मोठी हाऊस अशा अंतरपाट मधून आणि अन्य वस्तू मधून भागवण्याची क्रेज आता सुरू झाली आहे.