esakal | लशीचा ठणठणाट; पंतप्रधानांचा कोल्हापूरवरच अन्याय का?
sakal

बोलून बातमी शोधा

लशीचा ठणठणाट; पंतप्रधानांचा कोल्हापूरवरच अन्याय का?

लशीचा ठणठणाट; पंतप्रधानांचा कोल्हापूरवरच अन्याय का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : राज्यातील इतर जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक (covid-19) लस मुबलक मिळते; पण त्याचवेळी कोल्हापुरात (kolhapur) लस का मिळत नाही? याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM modi) यांचे लस धोरण चुकीचे असल्याचे कारण सांगितले जात आहे. इतर जिल्ह्यांत मुबलक प्रमाणात लस मिळत असताना पंतप्रधान मोदी यांचा कोल्हापूरवरच अन्याय कसा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

लसीकरणात राज्यात जिल्हा अव्वल असल्याचे एकीकडे सांगितले जाते; पण त्याचवेळी कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे मृत्यूची संख्याही वाढत असताना कोल्हापुरात लशीचा ठणठणाट (covid-19 vaccination) पाच दिवसांपासून कोल्हापुरात लस नाही. सद्यःस्थितीत कोरोना महामारीत काम करणारे व ६० वर्षांवरील व्यक्तींसह व्याधीग्रस्त, दिव्यांगांनाच लस दिली जाते, तीही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक होत आहे.

जिल्ह्यात ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय जीवनमान सुरळीत होणार नाही, असे मंत्री सांगतात. त्यासाठी पुरेसा लसपुरवठा व्हावा, यासाठी मात्र त्यांचे प्रयत्न दिसत नाहीत. औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांसह सांगली, सातारा जिल्ह्यांत लस मुबलक प्रमाणात मिळत आहे. एवढेच नव्हे, तर ऑनलाईन नोंदणीत कोल्हापूरच्या लोकांना सांगली, सातारा जिल्ह्यांतील केंद्रावर लस घेण्यास बोलावले जाते. पण, कोल्हापुरात मात्र लस मिळत नाही.

हेही वाचा: लाच घेताना तलाठी जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे तुटवडा असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून होत आहे; पण राज्यासाठी केंद्राकडून लस पुरवठा झाल्यावर त्याचा जिल्हानिहाय पुरवठा करण्याचे नियोजन राज्य सरकारच्या हातात असते; पण त्यातच जिल्ह्यातील मंत्री पुरेशी लस आणण्यात कमी पडतात की काय, असा प्रश्‍न जिल्ह्यातील लस तुटवड्यावरून उपस्थित होत आहे.

जनमनाची खदखद लक्षात घ्या

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांत लसीकरणाबाबत लोकांच्या तक्रारी नाहीत. जिल्ह्यात मात्र रोज या प्रश्‍नावरून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आज कोल्हापूर शहरात लोक रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करीत आहेत. लोकांच्या या खदखदीची दखल मंत्री घेणार आहेत का नाही? असाही संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: POKमध्ये क्रिकेट लीगचे आयोजन; शाहिद आफ्रिदी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

loading image